कोल्हापूर – शास्त्रीनगर ग्राऊंड अधिक दर्जेदार व अद्ययावत करण्यावर अधिक भर द्या, अशी सूचना महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती सचिन पाटील आणि उपमहापौर संजय मोहिते यांनी केली.
शास्त्रीनगर येथे अद्ययावत क्रिकेट ग्राऊंड तयार करण्याचे काम सुरु असून या कामाची पाहणी सभापती सचिन पाटील आणि उपमहापौर संजय मोहिते यांनी केली. त्यावेळी त्यांनी संबंधितांना अनेकविध सूचना केल्या.यावेळी काका पाटील, कनिष्ठ अभियंता संतोश आरमार आदिजण उपस्थित होते.
शास्त्रीनगर ग्राऊंड येथे अद्ययावत क्रिकेट ग्राऊंड तयार करा, महापालिका सर्वती मदत करीत आहे. या ग्राऊंडचे काम अधिक गतीने करा, यापुढील काळातील ग्राऊंडच्या देखभालीची व्यवस्था निर्माण करा, ग्राऊंडवर कायम स्वरुपी पाण्याची सुविधा निर्माण करा, अशा सूचनाही भापती सचिन पाटील आणि उपमहापौर संजय मोहिते यांनी केल्या.
सद्या शास्त्रीनगर ग्राऊंड येथे हायमास्क पोल उभारण्याचे काम पूर्ण झाले असून ग्राऊंडवरील पाणी निचऱ्याची कामही पूर्ण झाले आहे, तसेच पिचिंगचे काम सुरु असल्याची माहिती यावेळी मान्यवरांना देण्यात आली.