कोल्हापूर : पंचगंगा नदीत चार चाकी गाडी पडली अन्…

चालक पोहत आल्याने जीव वाचला

कोल्हापूर/ प्रतिनिधी – कोल्हापूरच्या पंचगंगा नदीत चार चाकी गाडी पडलीय. कसबा बावडा परिसरत असणाऱ्या पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावरुन चार चाकी गाडी थेट पाण्यात पडलीय. विशेष म्हणजे अर्धी गाडी बुडून पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ती वाहात गेलीय. यातील चालक सुखरुप बाहेर पोहत आल्याने तो वाचला आहे. दरम्यान गाडी पंचगंगेतून वाहत जातानाची दृश्ये मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

राजाराम बंधाऱ्यावरू आज दुपारी एक मोटार थेट नदीत पडली. चालकाने पाण्यातच गाडी बाहेर येऊन स्वतःचा जीव वाचविला. मोटार मात्र सुमारे एक किलो मीटर पुढे वाहत गेली. चालक पोहत पाण्याबाहेर आला. यावेळी येथे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

चालक जयजित श्रीकांत भोसले (वय 39, रा. रविवार पेठ) असे चालकाचे नाव आहे. याबाबतची नोंद करण्याचे काम शाहूपुरी पोलिसात सुरू होते. जयजीत भोसले हे वडणगे (ता. करवीर) कडून राजाराम बंधारा मार्गे कसबा बावड्याच्या दिशेने येत होते.

राजाराम बंधाऱ्याचा अंदाज न आल्याने ही मोटार थेट नदीत पडली. ही घटना नदीकाठी असणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आला. त्यांनी आरडाओरड केली. पण मोटार वाहत्या प्रवाहाबरोबर पुढे जात होती. दरम्यान यातील चालक जयजीत भोसले यांनी प्रसंगावधान ओळखून मोटारीतून बाहेर पडले.

त्यानंतर पोहत ते काठाच्या दिशेने येत होते. त्यांना येथील नागरिकांनी मदत केली. तसे ते सुखरूप पाण्याबाहेर आले. पण मोटार वाहत्या पाण्याला लागल्याने तिला बाहेर काढण्यात नागरिकांना यश आले नाही. अखेरीस हा प्रकार शाहूपुरी पोलिसांना समजला. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.