कोल्हापूर ( प्रतिनिधी ) – बंगला हेरून दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या पाच जणांच्या टोळीला राजारामपुरी पोलिसांनी जेरबंद केले.
त्यांच्याकडून गावठी पिस्तूलासह चार जीवंत काडतूसे असलेले मॅगझीन, तलवार, अलिशान मोटारीसह सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. सायबर चौकात रात्री घडलेल्या या थरारनाट्यात एक पोलिस कर्मचारीही जखमी झाला.
अजिंक्य मनोहर भोपळे (वय 28, रा. वाशी नवी मुंबई, मूळ रा. चोकाक, हातकणंगले), जयवंत सर्जेराव सावळे (वय 36), दीपक जनार्दन आडगळे (वय 30, दोघे रा. रा. कोपर्डी, हवेली, कराड), अनिल आनंदा वायदंडे (वय 49, रा. बनवडी ता. कराड), वैभव दादासाहेब हजारे (वय 26, बनवडे फाटा, ता. कराड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत