कोल्हापूरात “निर्भय- मॉर्निंग वॉक; कॉ. पानसरे यांच्या हत्येला चार वर्षे पूर्ण

कोल्हापूर – कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला आज चार वर्षे पूर्ण झाल्यानंतरही तपासात गती नसल्याने कोल्हापूरमध्ये डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी निर्भय मॉर्निंग वॉक काढला. यामध्ये सामाजिक चळवळीतील अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्यासह मेघा पानसरे, उमा पानसरे, मुक्ता दाभोळकर आणि ज्येष्ठ विचारवंत यामध्ये सहभागी झाले होते. पानसरे यांच्या निवासस्थानापासून ते बिंदू चौकापर्यत हा मॉर्निंग वॉक काढण्यात आला.

यावेळी डॉ. एन. डी. पाटील यांनी सर्वांना शपथ दिली. कर्नाटक एसआयटीने तपास गतीने केला. त्यांच्या तपासामुळे दाभोळकर आणि पानसरे यांच्या हत्येतील महत्त्वाचे धागेदोरे हाती आले. तसा तपास महाराष्ट्र एसआयटीने करावा, असे मत यावेळी मुक्ता दाभोळकर यांनी व्यक्त केले.

दरम्यान, कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी एसआयटीकडून चार जणांवर पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 8 आरोपींकडे एसआयटी कडून चौकशी झाली असून अमित देगवेकर, अमोल काळे, वासुदेव सूर्यवंशी, भारत कुरणे या चार जणांच्याविरोधात 400 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. कट रचणे, गुन्हा करण्यास प्रवृत्त, खून करने या कलमाखाली हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. भक्कम पुराव्यांसह 85 साक्षीदारांचा अंतर्भाव यात करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.