कोल्हापूर : हातकणंगलेमध्ये कारखान्याला भीषण आग; धुराचे लोट ३ किलोमीटरपर्यंत पसरले

कोल्हापूर : हातकणंगलेतील लक्ष्मी औद्योगिक वसाहतीत एका कारखान्यास भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आग एवढी भयानक होती कि आगीच्या धुराचे लोट सुमारे ३ किलोमीटरपर्यंत पसरले असल्याचे सांगण्यात येत आहे.

बॉयलरच्या ठिकाणी असलेल्या सुमारे १० लिटर्सचा ऑईलचा टँक आणि सुमारे ४० टन दगडी कोळशाला आग लागली आहे. दरम्यान, आगीचे रौद्र रूप पाहता इचलकरंजी नगरपालिकेचे २, संजय घोडावत उद्योगसमूह १, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखाना १ असे एकूण ८ पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, या आगीमध्ये सुमारे १० कोटींचे नुकसान झाल्याचे प्रथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.