अनिश्चित पाऊस, वीज आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी यांमुळे शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा पुन्हा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. याबाबत विद्यापीठाने एका परिपत्रकाद्वारे माहिती दिली असून यानुसार आता 21 तारखेपासून सुरू होणाऱ्या परीक्षा 27 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहेत.
शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे यांनी परिपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. या परिपत्रकामध्ये, अनिश्चित पाऊस, वीज आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी यामुळे परिक्षा लांबणीवर टाकल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आलंय.
दरम्यान, 27 ऑक्टोबर पासून होणाऱ्या परीक्षांचे नव्याने वेळापत्रक जाहीर होणार आहे.