कोल्हापुरमध्ये विजयी मिरवणुका, सार्वजनिक ठिकणी गुलाल उधळण्यास बंदी

फटाके फोडण्यासही जिल्हा प्रशासनाने घातली बंदी;मतमोजणीच्या अनुषंगाने 144 कलम जिल्ह्यात लागू

कोल्हापूर  विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुर जिल्ह्यात विजयी मिरवणुका काढणे, सार्वजनिक ठिकणी गुलाल उधळण्यास बंदी घालण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे फटाके फोडण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. मतमोजणीच्या अनुषंगाने जिल्ह्यात 144 कलम जिल्ह्यात लागू करण्यात आले आहे. दरम्यान, उद्या विधानसभेचा निकाल जाहिर होत आहे.

त्यासाठी कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे. आपलाच उमेदवार विजयी होणार य़ाची खात्री त्यांना असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. मात्र, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या या निर्णयाने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना आहे.

आता जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाला नेते व कार्यकर्ते कसा प्रतासाद देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.