-->

कोल्हापुर – अहमदाबाद विमानसेवा सुरू; पहिल्याच दिवशी 69 जणांनी केला प्रवास

कोल्हापूर – कोल्हापुर-अहमदाबाद विमानसेवेची प्रतिक्षा आता अखेर संपली आहे. कारण दक्षिण महाराष्ट्रातील तिरूपती, बंगळूरू, हैदराबाद तसेच मुंबईनंतर आता अहमदाबादलाही कोल्हापूरातून विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. आज या मार्गावरील पहिले विमान कोल्हापूर विमानतळावर उतरले.

यावेळी वॉटर सॅल्युट देऊन या विमानाचे स्वागत करण्यात आले. आजच्या पहिल्याच दिवशी 69 प्रवाशांनी या विमानातून प्रवास केला. याच्या स्वागताला खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील विमानतळ प्रशासनाचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते.

कोल्हापुरातून अहमदाबादसह राजकोट, सुरतला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये कापड व्यावसायिकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे आजपासून सुरू झालेल्या कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवेचा सर्वांना फायदा होणार आहे. आज पहिल्याच दिवशी 69 इतक्या प्रवाशांनी या विमानातून प्रवास केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.