कोल्हापूर, – कोल्हापुर-अहमदाबाद विमानसेवेची प्रतिक्षा आता अखेर संपली आहे. कारण दक्षिण महाराष्ट्रातील तिरूपती, बंगळूरू, हैदराबाद तसेच मुंबईनंतर आता अहमदाबादलाही कोल्हापूरातून विमानसेवा सुरू करण्यात आली आहे.
गया मार्गावरील पहिले विमान आज कोल्हापूर विमानतळावर उतरले. यावेळी वॉटर सॅल्युट देऊन या विमानाचे स्वागत करण्यात आले. आजच्या पहिल्याच दिवशी 69 प्रवाशांनी या विमानातून प्रवास केला. याच्या स्वागताला खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील विमानतळ प्रशासनाचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते.
कोल्हापुरातून अहमदाबादसह राजकोट, सुरतला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये कापड व्यावसायिकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे आजपासून सुरू झालेल्या कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवेचा सर्वांना फायदा होणार आहे.