देहू परिसरात कोजागिरी पौर्णिमा साजरी

देहुरोड – देहू-देहूरोड परिसरात विविध सार्वजनिक मंडळे, प्रतिष्ठान तसेच नागरिकांनी मोठ्या उत्साहात कोजागिरी पौर्णिमा साजरी केली. काही नवरात्रोत्सव मंडळांनी डीजे, ढोल-ताशांच्या गजरात देवीचे विसर्जन केले. शरद ऋतूतील अश्‍विन महिन्यात येणारी पौर्णिमाला कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा असे संबोधले जाते. इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे सप्टेंबर, ऑक्‍टोबर महिन्यात ही पौर्णिमा येत असते.

खगोल शास्त्रानुसार अश्‍विन महिन्यात येणाऱ्या मध्यरात्रीच्या कोजागिरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. त्यामुळे चंद्राचे तेज अधिक जाणवते. अश्‍विन पौर्णिमेला हिंदू सण म्हणून साजरा केला जातो. या पौर्णिमेच्या रात्री दुधात ड्राय फ्रूट मिक्‍स करून चंद्राच्या प्रकाशमान किरणामध्ये दूध उखळण्यास ठेवले जाते. मध्य रात्रीला चंद्र डोक्‍यावर आला की त्याची प्रतिमा दुधात पडल्यानंतर दूध वाटप करून पिण्याची परंपरा साजरी केली जाते. तत्पूर्वी विविध धार्मिक, सांस्कृतीक, मनोरंजक कार्यक्रम साजरा केला जातो.

देवीच्या विसर्जन मिरवणुका –
राजेश मांढरे युवा मंचच्या वतीने प्रतिवर्षानुसार विकासनगर येथे ऑर्केस्ट्रा दांडिया गरबा खेळ आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर दुधाचे वाटप करून कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली. कार्यक्रमावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

देहूगाव येथील जगदंबा मित्र मंडळ तसेच महालक्ष्मी मित्र मंडळाने नवरात्रोत्सवातील केलेली देवीची प्रतिष्ठापना कोजागिरी पौर्णिमेला विसर्जन केले डीजे, ढोल-ताशांच्या गजरात, रंगीत विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजवलेल्या रथातून देवीची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी देहुरोड पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.