नवी मुंबई – भारताचा कर्णधार विराट कोहली हा जगातील अन्य खेळाडूंच्या तुलनेत खूप महान खेळाडू आहे. खेळाच्या प्रत्येक स्वरूपामध्ये त्याचे कौशल्य इतरांपेक्षा खूपच वादातीत आहे, अशा शब्दांत वेस्ट इंडिजचे ज्येष्ठ क्रिकेटपटू ब्रायन लारा यांनी कोहली याचे कौतुक केले आहे.
लारा यांनी सांगितले की, रोहित शर्मा याने या स्पर्धेत चार शतके केली असली तरी सर्व प्रकारच्या सामन्यांचा विचार केला तर कोहली म्हणजे धावांचे मशीन आहे असे माझे मत आहे. अन्य फलंदाजांपेक्षा त्याची शैली स्फोटक असून तो सर्वच गोलंदाजांवर प्रभुत्व गाजवित असतो. असे असले तरी माझ्या दृष्टीने सचिन तेंडुलकर हा आदर्श खेळाडू आहे.