सर्वकालीन संघात कोहलीला स्थान नाही

सचिनसह एकूण चार भारतीयांचा समावेश

लाहोर – पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने आपला सर्वकालीन एकदिवसीय क्रिकेट संघ निवडला आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे या संघात भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली याच्यासह रिकी पॉंटिंग, कुमार संगकारा, ग्लेन मॅकग्रा आणि ब्रायन लारा या दिग्गज खेळाडूंनाच संघात स्थान दिलेले नाही. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे त्याने संघाचे कर्णधारपद चक्‍क शेन वॉर्न या महान फिरकी गोलंदाजाकडे सोपवले आहे.

शोएबने आपल्या संघात चार भारतीय खेळाडूंचा समावेश केला आहे. महान क्रिकेटपटू कपिल देव, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी व युवराजसिंग या चार भारतीयांना संघात स्थान दिले गेले आहे.

त्याचबरोबर वेस्ट इंडिजचे महान खेळाडू गॉर्डन ग्रीनिज यांच्यासह पाकिस्तानच्या इंजमाम उल हक आणि सईद अन्वर यांनाही स्थान दिले आहे. संघात तीन वेगवान गोलंदाजांना संधी देण्यात आली असून त्यात वसीम अक्रम, वकार युनुस यांचाही समावेश आहे.

शोएबचा सर्वकालीन एकदिवसीय संघ – शेन वॉर्न (कर्णधार), गॉर्डन ग्रीनिज, सचिन तेंडुलकर, इंजमाम उल हक, सईद अन्वर, महेंद्रसिंग धोनी, ऍडम गिलख्रिस्ट, युवराजसिंग, वसीम अक्रम, वकार युनुस, कपिल देव.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.