नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह आहे. जगभरात कोहलीचे चाहते आहेत. त्यामुळे सोशल मीडिया अकाउंट्सवर त्याच्या चाहत्यांची संख्या कोटींमध्ये आहे.
इन्स्टाग्राम पोस्टद्वारे सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींची यादी जाहीर केली असून, त्यात स्थान मिळालेला कोहली हा एकमेव भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. इन्स्टाग्रामवर एक प्रायोजित पोस्ट केली तर त्याबद्दल कोहलीला तब्बल पाच कोटी रुपये मिळतात.
इन्स्टाग्राम पोस्टद्वारे सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो पहिल्या क्रमांकावर आहे. त्याला एका पोस्टसाठी 11.9 कोटी रुपये मिळतात.