मुंबई – करण जोहरचा प्रसिद्ध ‘कॉफी विथ करण’ या टिव्ही शोच्या संदर्भात महत्वाची बातमी समोर आली आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित पोलखोल करणारा हा प्रसिध्द शो बंद होणार आहे. ‘कॉफी विथ करण’चा नवीन सीझन येणार नसल्याची घोषणा करण जोहरने केली आहे. यासंदर्भात त्याने एक इन्स्टा पोस्ट टाकली आहे.
करण जोहरने नेहमीच त्याच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटींची पोलखोल केली आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याशातील किस्से या शोच्या माध्यमांतून दाखविले जातात. त्यामुळे या शोला चाहत्यांनी चांगली पसंती दर्शवली आहे. मात्र ‘कॉफी विथ करण’च्या चाहत्यांसाठी ही वाईट बातमी आली आहे. याबाबत स्वत: करणने खुलासा केला आहे. करणच्या ‘कॉफी विथ करण’ शोने नेहमीच लोकांचे मनोरंजन केले आहे. या शोमधून बॉलीवूड सेलिब्रिटींचे अनेक इनसाइड अपडेट्स प्रक्षेकांना बघायला मिळाले आहेत.
View this post on Instagram
पोस्ट शेअर करत करण जोहरने लिहिले की, हॅलो.. कॉफी विथ करण हा नेहमीच माझ्या आणि तुमच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. 6 सीझनपर्यंत या शोने सर्वांचे मनोरंजन केले आहे. मला वाटते की आम्ही पॉप संस्कृतीत प्रभाव पाडला आहे आणि आमचे स्वतःचे स्थान देखील कोरले आहे. हृदयावर दगड ठेवून मला म्हणावं लागेल की आता कॉफी विथ करणचा नवा सीझन येणार नाही – करण जोहर