कोबे ब्रायंटच्या मृत्यूबाबत ८ वर्षांपूर्वी केललं भाकीत ठरलं तंतोतंत खरं!

‘ब्लॅक मांम्बा’ अशी ओळख असलेला अमेरिकन स्टार बास्केटबॉलपटू कोबे ब्रायंट याचे काल एका हवाई दुर्घटनेमध्ये निधन झाले. कोबे याच्यासोबतच हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करीत असलेली त्याची मुलगी गियाना ही देखील या दुर्घटनेमध्ये आपल्या प्राणास मुकली. कोबे व त्याची मुलगी गियाना यांच्या आकस्मित ‘एक्झिट’मुळे जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत असून सोशल मीडियावर देखील कोबेचे चाहते दुःख व्यक्त करताना दिसतायेत.

अशातच आता जगप्रसिद्ध मायक्रो ब्लॉगिंग साईट ‘ट्विटर’वर कोबे ब्रायंटच्या मृत्यूबाबत करण्यात आलेल्या एका ट्विटमुळे खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, @dotnoso नावाच्या एका ट्विटर खात्यावरून कोबे ब्रायंट याचा मृत्यू हेलिकॉप्टर अपघातात होईल असं भाकीत करणार ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चिलं जात आहे. कोबेच्या मृत्यूबाबत भाकीत करणार हे ट्विट २०१२मध्ये करण्यात आलं असून या ट्विटच्या सतत्येबाबत सध्या नेटकरी तर्क-वितर्क लढवताना दिसत आहेत.

कोबेच्या मृत्यूचे भाकीत करणाऱ्या या ट्विटबाबत काही नेटकरी, हे ट्विट थर्ड पार्टी ऍप्लिकेशनद्वारे ‘एडिट’ करण्यात आल्याचा दावा करीत आहेत तर या दाव्याला विरोध करणाऱ्यांनी ट्विटरवर एकदा ट्विट केल्यांनतर ते बदलता येत नसल्याने या ट्विटमध्ये छेडछाड केल्याची संभावना नाही असं मत मांडलंय.

कोबे हा अनेकदा हेलिकॉप्टरचे सारथ्य स्वतः करत होता त्यामुळे त्याच्या मृत्याबाबत भाकीत करणारे ट्विट या संदर्भात केलं गेलं असावं अशी अटकळ काही ट्विटर युझर्सनी बांधली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here