PM Narendra Modi’s Podcast: झिरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांनी पंतप्रधान मोदींची घेतलेली मुलाखत विशेष गाजली. पंतप्रधान मोदींचे हे पहिलेच पॉडकास्ट होते. मात्र, आता पंतप्रधान मोदी आणखी एका पॉडकास्टमध्ये सहभागी होणार आहेत. प्रसिद्ध अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमॅन यांनी याबाबतची माहिती सोशल मीडियावर देखील आहे. मोदी लेक्स फ्रीडमॅन यांच्या पॉडकास्टमध्ये सहभागी होणार आहेत.
निखिल कामथ आणि पंतप्रधान मोदींचा पॉडकास्टची विशेष चर्चा झाली. पहिल्या वहिल्या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान मोदींनी भारताची प्रगती, जीवन, राजकीय आयुष्यातील घटना अशा विविध मुद्यांवर भाष्य केले. आता मोदी लेक्स फ्रीडमॅन यांच्या पॉडकास्टमध्ये सहभागी होणार आहेत.
I will be doing a podcast with Narendra Modi (@narendramodi), Prime Minister of India, at the end of February.
I’ve never been to India, so I’m excited to finally visit and experience many facets of its vibrant, historic culture and its amazing people as fully as I can.
— Lex Fridman (@lexfridman) January 18, 2025
फेब्रुवारीच्या अखेरीस प्रेक्षकांना हा पॉडकास्ट पाहता येणार आहे. लेक्स फ्रीडमॅन यांनी या पॉडकास्टची घोषणा करताना लिहिले की, फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत पॉडकास्ट करणार आहे. मी यापूर्वी भारतात कधीही आलेलो नाही. त्यामुळे या प्रवासासाठी, येथील विविधता, ऐतिहासिक संस्कृती आणि अद्भुत लोकांना भेटण्यास व जाणून घेण्यास उत्सुक आहे.
लेक्स फ्रीडमन कोण आहे?
लेक्स फ्रीडमन प्रसिद्ध कॉम्प्युटर साइंटिस्ट आणि युट्यूबर आहे. त्यांच्या युट्यूब चॅनेलवर 45 लाखांपेक्षा अधिक सबस्क्राइबर्स आहेत. लेक्स फ्रीडमन यांना त्याच्या विविध विषयांवरील पॉडकास्टसाठी ओळखले जाते. त्यांनी 2018 मध्ये ‘The Lex Fridman Podcast’ नावाने शो सुरू केला होता. हा शो प्रामुख्याने विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा आणि राजकारणातील प्रभावशाली व्यक्तींसोबतच्या पॉडकास्टसाठी ओळखला जातो.
लेक्स फ्रीडमन यांच्या पॉडकास्टमध्ये यापूर्वी स्पेसएक्सचे संस्थापक इलोन मस्क, ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फेसबुकचे सह-संस्थापक मार्क झुकेरबर्ग आणि युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोदिमिर झेलेन्स्की सारखे प्रभावशाली व्यक्ती सहभागी झाले आहेत.