जाणून घ्या मराठमोळ्या दिसणाऱ्या ‘त्या’ आजीबाई आहेत तरी कोण?

नवी दिल्ली – काल बर्मिंघम येथे झालेल्या भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यामध्ये भारतीय संघाला उस्फूर्तपणे चिअर करणाऱ्या एक आजीबाई मीडियाच्या चांगल्याच प्रकाशझोतात आल्या. सामना सुरू असताना हातात भलीमोठी पिपाणी घेऊन भारतीय संघाला प्रोत्साहन देणाऱ्या या आजीबाईंची सामना जिंकल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि शतकवीर रोहित शर्मा यांनी जातीने भेट घेतली.


सामना सुरू असताना गालावर तिरंगा आणि हातात पिपाणी घेऊन या आजीबाई टीम इंडियासाठी जोरदार चिअर करत होत्या. भारताची फलंदाजी सुरू असताना चौकार-षटकार लागतातच आणि नंतर आपल्या गोलंदाजांच्या यशावर या आजीबाई हातातील पिपाणी वाजवत प्रोत्साहन देत होत्या त्यांचा हा उत्साह पाहून मैदानातील सर्वांनीच त्यांना दाद दिली.

चारुलता पटेल नामक या 87 वर्षीय आजीबाई मूळच्या टांझानियाच्या असून त्यांचे आई-वडील भारतीय होते. भारतात जन्म झाला नसला तरी आपल्याला भारतीयांविषयी कमालीचे प्रेम असल्याचं या आजीबाईंनी सांगितलं. त्यांना दोन मुले असून या दोघांना देखील क्रिकेट खेळण्याची आवड आहे तर आपल्याला क्रिकेट पाहण्याची आवड आहे अशी माहितीदेखील त्यांनी दिली.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here