जाणून घ्या, ‘ही’ आहेत दुसऱ्या लाटेतील करोनाची लक्षणे; WHOने दिली माहिती

नवी दिल्ली – करोना विषाणूचा नवीन स्ट्रेन सक्रिय झाल्याने, त्याची नवीन लक्षणे देखील समोर येत आहेत. नवीन लक्षणांमध्ये पोटात वेदना, उलट्या होणे, सांधेदुखी, अशक्तपणा येणे, भूक न लागणे आदींचा समावेश आहे.

जागतिक आरोग्या संघटना अर्थात डब्ल्यूएचओच्या मते, वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळी लक्षणे दिसत आहेत. ही लक्षणे एखाद्या व्यक्तीस विषाणूच्या संसर्गाच्या 5-6 दिवसांनी दिसतात. काही प्रकरणांमध्ये ही लक्षणे 14 दिवसांपर्यंत देखील नोंदविली गेली आहेत.

भारत सरकारच्या म्हणण्यानुसार, यावेळी देशातील 18 राज्यांत करोनाचे नवे स्ट्रेन सापडले आहेत. यामध्ये महाराष्ट्रात सापडलेल्या डबल म्यूटेंट स्ट्रेनचाही समावेश आहे. महाराष्ट्रात रुग्ण वाढत आहेत. येथे व्हायरसमध्ये दोन बदल झाले आहेत. यामुळे त्याचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे.

नवीन प्रकरणांबाबत भारतात केलेल्या अभ्यासानुसार बदलत्या स्ट्रेनमुळे लक्षणेही बदलत आहेत. आता फक्त ताप, थकवा किंवा कोरडा खोकला, चव आणि गंध जाणे ही करोनाची लक्षणे राहिलेली नाहीत. नवीन लक्षणांमध्ये पोटात वेदना, मळमळ, उलट्या आणि सर्दी तसेच स्नायू दुखणे, लैंगिकदृष्ट्या अकार्यशील, अशक्तपणा, भूक कमी होणे यांचा समावेश आहे. ताप आणि खोकला यासारख्या सामान्य लक्षणांनंतरही टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.