जाणून घ्या.., बर्फाचे माहित नसलेले फायदे

पुणे – उन्हाळा आणि बर्फ यांचे अतूट नाते आहे. उन्हाळा सुरू झाला की बर्फाची आठवण येते. लहानपणी खाल्लेल्या बर्फाच्या गोळ्याची आठवण तर मोठेपणीही येत राहते. तो पुन्हा खावासा वाटतो. बर्फ म्हटले की गारवा येतो. केवळ गारव्यासाठी नाही, तर अनेक गोष्टींसाठी बर्फ उपयोगी आहे.

उन्हाळ्यात बर्फ नाव घेतलं तरी थंड वाटू लागतं पण गारेगार बर्फाचे इतर अनेक उपयोग आहेत. पाहा-
– उलट्या बंद होत नसतील तर बर्फ चोखावा.
– शरीरातील कोणत्याही भागातून रक्‍त येणं थांबत नसेल तर त्यावर बर्फ लावण्याने रक्त येणे लगेच थांबतं.
– पायाच्या टाचांमध्ये वेदना होत असतील तर बर्फ चोळल्याने आराम मिळेल.
– जास्त खाल्ल्यामुळे अपचन होत असल्यास जेवण लवकर पचण्यात मदत मिळेल.
बर्फाचे उन्हाळ्यात आपल्या त्वचेलाही

अनेक फायदे आहेत-
– घामोळ्या दूर होतात. घामोळ्यांच्या ठिकाणी बर्फाने मसाज केल्याने शरीराचे तापमान कमी होते. यामुळे उष्णता दूर होते आणि घामोळ्या कमी होतात.
– काळे डाग दूर करते. बर्फाने मसाज केल्यास त्वचेवरी काळे डाग कमी होतात.
– बर्फाने चेहऱ्याची मसाज केल्यास त्वचेवरील बॅक्‍टेरिया कमी होतात. यामुळे पिंपल्सच्या तक्रारीही दूर होतात.
– डार्क सर्कल्स कमी : बर्फाने चेहऱ्याला मसाज केल्यास डार्क सर्कल कमी होतात.
– नियमित बर्फाने चेहऱ्याची मसाज केल्यास डेड सेल्स दूर होतात. सुरकुत्यांची समस्या दूर होते.
– स्किन सॉफ्ट होते : नियमित बर्फाने मसाज केल्यावर त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो. यामुळे स्किन सॉफ्ट राहते.
– बर्फाने चेहऱ्याची मसाज केल्यास त्वचेचा ग्लो वाढतो. त्वचा तजेलदार बनते.
– तेलकटपणा दूर होतो : नियमित बर्फाने मसाज केल्यास स्किन पोर्स आकसतात आणि कमी होतात. यामुळे त्वचेमधून निघणाऱ्या ऑइलचे प्रमाण कमी होते.
हे माहीत झाल्यानंतर आता बर्फाचा उपयोग करणे सुरू करा आणि त्याचे फायदे घ्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.