“भाजपच्या काळात दहशतवाद्यांना महिलांच्या वेशात पकडलं जातंय” जाणून घ्या व्हायरल दाव्याची सत्यता…

काय आहे सत्य वाचा एका क्लिकवर

नवी दिल्ली –   समाज माध्यमांवर अनेक फोटो, व्हिडिओ, बातम्या व्हायरल होत असतात. एकाचवेळी इंटरनेट वापरकर्त्यांनी एखादी पोस्ट शेअर केल्यास ती व्हायरल होत असते. मात्र अनेकदा आपण शेअर करत असलेला फोटो व्हिडिओ अथवा बातमी खरी आहे का? याबाबतची शहानिशा करत नाही. आंधळेपणाने शेअर केलेल्या पोस्टमुळे मोठा गोंधळ उडू शकतो. अशा वेळी एखादी पोस्ट व्हायरल होत असल्यास त्या बाबतची सत्यता पडताळून पाहणे आवश्यक ठरते. आज आपण अशाच एका व्हायरल पोस्ट मागचे सत्य जाणून घेणार आहोत…

सोशलवर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत सुरक्षा रक्षक एका माणसाला पकडून घेतून जातांना दिसत आहे. विशेष म्हणजे पकडलेला माणूस याने महिलेचे कपडे घातले आहे.  सोशलवर हा व्हायरल फोटो भारतातील असल्याचे म्हंटले जात आहे.

अनेकांनी या  व्हायरल फोटोला  सोशलवर भारतात भाजप सरकारच्या काळात दहशतवादी अशा प्रकारे पकडण्यात येतात असं म्हणत शेअर केले आहे. मात्र या फोटोचे  इंडिया टुडे एंटी फेक न्यूज वॉर रूम (AFWA) ने  फॅक्ट चेक केले असता. हा फोटो भारतातील नसून  अफगानिस्तानचा  2012 सालातील असल्याचे दिसून आले आहे. 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.