नवी दिल्ली – एचडीएफसी सिक्युरिटीजच्या नुसार सोमवारी देखील सोन्याच्या किमंतीमध्ये चढ-उतार पाहायला मिळाला. राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये 44 रूपयांनी घसरण होऊन सोन्याचा प्रति 10 ग्रॅम 53 हजार 040 रूपये इतका दर झाला.
या संदर्भात एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, “रुपयाच्या किंमतीत चढ-उतारांबरोबरच 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीही दिल्लीत चढ-उतार झाला आहे.”
चांदीबद्दल बोलायचे झाले तर चांदीचे दर 206 रुपयांनी घसरून 68,202 रुपये प्रति किलो झाले. जागतिक बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रति औंस 1 हजार 950 डाॅलर तर चांदीचा भाव 26.80 दर इतका होता.