वाॅशिंग्टन – अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडन यांना विजय मिळाला आहे. जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या निवडणुकीवर संपूर्ण जगाचे लक्ष होते. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाबाबत एवढी क्रेझ का आहे, त्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतात हे आपण पाहणार आहोत.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हे पद जगातील कोणत्याही देशाच्या राष्ट्रध्यक्षांपेक्षा अधिक सामर्थ्यवान समजले जाते. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांकडे अमर्याद अधिकार असतात. येथील राष्ट्राध्यक्षांना मोठे वेतन मिळते. तसेच अनेक प्रकारचे भत्ते देखील मिळतात. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना मिळणाऱ्या सुविधा या क्वचितच इतर देशातील राष्ट्राध्यक्षांना मिळतात.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना मिळणाऱ्या सुविधा –
1) अमेरिका राष्ट्राध्यक्षांना वार्षिक 4 लाख डाॅलर वेतन मिळते. (भारतीय रुपयात – 2.9 कोटी)
2) सेवानिवृत्तीनंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हे निवृत्तीवेतन मिळते.
3) वैयक्तिक विमान, हेलिकाॅप्टर मिळते.
4) वर्षाकाठी 50 हजार डाॅलर खर्च भत्ता मिळतो. (भारतीय रूपयात – 40 लाख रूपये)
5) प्रवासासाठी एक लाख डाॅलर मिळतात.
6) 19 हजार डाॅलर करमणुक भत्ता मिळतो.
7) जगप्रसिद्ध सर्व सोयीसुविधायुक्त व्हाईट हाऊस मिळते.
व्हाॅईट हाउसबाबत थोडक्यात माहिती-
– अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना 1972 मध्ये प्रथम व्हाईट हाऊस देण्यात आले होते.
– व्हाईट हाऊसमध्ये 6 मजले आणि 132 खोल्या आहेत.
– टेनिस कोर्ट आणि स्विमिंग पूल आहे.
– 51 सीट असलेले थिएटर आहे.