PVC आधार कार्ड… कधी, कसे आणि किती रूपयात बनवू शकता ते ही ‘घरबसल्या’, जाणून घ्या सर्वकाही

नवी दिल्ली – आजकाल आपल्या सर्वांसाठी आधार हे एक खूप आवश्यक कागदपत्र आहे, ज्याशिवाय आपण घरापासून ते बँकेपर्यंतचे कोणतेही काम करू शकत नाही. सर्व कामांसाठी आपल्याला आधार नंबरची आवश्यकता असते. UIDAI कडून पुर्वी कागदाचे आधार जारी केले जात होते, मात्र, याचा वापर पाहता युआयडीएआय ने पीव्हीसी आधार जारी करने सुरू केले आहे. पीव्हीसी आधार हे एटीएम सारखेच दिसते आणि ते फाटण्याचा धोका नाही. जाणून घ्या हे कार्ड तुम्ही कसे बनवू शकता…

याप्रकारे सहजतेने बनवू शकता पीव्हीसी कार्ड –

  • नवीन आधार पीव्हीसी कार्डसाठी तुम्हाला यूआयडीएआय च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • येथे My Aadhaar सेक्शनमध्ये जाऊन Order Aadhaar PVC Card वर क्लिक करा.
  • यानंतर 12 डिजिट नंबर किंवा 16 डिजिट चे व्हर्चुअर आयडी किंवा 28 डिजिट चे आधार एनरोलमेंट आयईडी टाका.
  • नंतर सिक्युरिटी कोड किंवा कॅप्चा भरा आणि ओटीपी साठी Send OTP वर क्लिक करा.
  • यानंतर रजिस्टर्ड मोबाईल वर प्राप्त झालेला ओटीपी दिलेल्या जागेत भरा आणि सबमिट करा.
  • आता पीव्हीसी कार्डचा एक प्रिव्ह्यू तुमच्यासमोर येईल.
  • यानंतर खाली दिलेल्या पेमेंट ऑप्शनवर क्लिक करा.
  • यानंतर तुम्ही पेमेंट पेजवर जाल, येथे तुम्हाला 50 रूपये फी जमा करावी लागेल.
  • पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुमच्या आधार पीव्हीसी कार्डची ऑर्डर प्रोसेस पूर्ण होईल.

PVC आधार ची वैशिष्ट्ये –
नवीन पीव्हीसी आधार कार्ड पुर्वीच्या आधार कार्डच्या तुलनेत सुरक्षेसह ड्यूरेबिलिटी मध्ये सुद्धा अधिक प्रभावी आहे. Aadhaar PVC Card आधुनिक सिक्युरिटी फिचर्स सोबत येते. नवीन आधार कार्डची प्रिंटिंग क्वाॅलिटी उत्तम केली गेली आहे. UIDAI ने पीव्हीसी आधार कार्डमध्ये अनेक सिक्युरिटी फीचर्स भी समाविष्ट केले आहेत, ज्यात गिलोच पॅटर्न, होलोग्राम, घोस्ट इमेजसह माइक्रोटेक्स्ट लावण्यात आले आहे.

येथे मिळेल आधारसंबंधी समस्यांचे समाधान –

UIDAI च्या म्हणण्यानुसार तुम्ही आधार संबंधीच्या कोणत्याही समस्येसाठी 1947 या क्रमांकावर काॅल करू शकता. येथे तुम्हाला आधार संबंधातील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. याव्यतिरिक्त कार्डधारक युआयड़ीएआय च्या https://resident.uidai.gov.in/lost-uideid या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन एनरोलमेंट आईडी मिळवू शकता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.