नवी दिल्ली : कोरोना विषाणू प्रथमत: चिनमधील वुहानमध्ये आढळला. त्याचे नाव कोरोना व्हायरस डिसीस 2019 असे ठेवण्यात आले. को (CO) कोरोनासाठी, वि (VI) व्हायरससाठी आणि द (द) डिसीससाठी असे शब्द घेऊन त्याने नामकरण कोविद 19 असे करण्यात आले.
वैद्यकीय मास्क वापरावा का?
जर कोरोनाची लक्षणे (खोकला आणि शिंका) आढळत असतील तर इतरांच्या सुरक्षिततेसाठी मास्क वापरा. जर तुम्हाला शिंका येत नसेल तर मास्क वापरण्याची गरज नाही. जर मास्क जीर्ण झाला असेल आणि वापरलेला असेल तर तर त्याची विल्हेवाट योग्य पध्दतीने लावा म्हणजे हा विषाणू आणखी पसरणार नाही. केवळ मास्कचा वापर हा संसर्ग थांबवण्यास पुरेसा नाही, हे लक्षात असू द्या. त्यामुळे सारखे हात धुणे, शिंका आणि खोकला येत असल्यास तोंड झाकून घ्या. ताप आणि तापासारखी लक्षणे असणाऱ्या लोकांशी निकटचा संपर्क टाळा.
कोविद 19चा लहान मुलांवर काय परिणाम होतो?
हा नवीन विषाणू आहे. त्यामुळे त्याचा लहान मुलांवर अथवा गर्भवती महिलांवर काय परिणाम होतो हे अद्याप समोर आले नाही. मात्र या विषाणूच्या संपर्कात आलेल्या कोणालाही तो होऊ शकतो. मात्र मुलांमध्ये कोरोनाच्या फार कमी केसेस आढळल्या आहेत. बाधीतांपैकी अत्यंत कमी जणांचे प्राण यात जातात. मुख्यत:मृत्यू पडणाऱ्यांत वयस्कर आणि आधीच औषधे सुरू असणाऱ्या व्यक्तींची संख्या अधिक आहे.
जर माझ्या मुलात कोरोनाची लक्षणे आढळली…
तातडीने त्याला डॉक्टरला दाखवा. सध्या तू बदल होत असल्याने फ्लूची साथ पसरते. कोरोनाची लक्षणेही फ्लूसारखी असल्याने भीती वाटणे स्वाभाविक आहे. मात्र त्यामुळे घाबरून न जाता वैद्यकीय तपासणी करावी. मुलाला सारखे हात धुण्याची सवय लावा. त्याल प्रतिबंधात्मक औषधे द्या. सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा. डॉक्टरकडे नेत असताना त्याचे तोंड आणि नाक मास्क अथवा कापडाने झाकले जाईल, याची दक्षता घ्या.
(क्रमश:)