कोतवाली पोलिसांची कारवाई; 11 लाख 46 हजारांचा मुद्देमाल जप्त
नगर : माळीवाडा बसस्थानका बाहेरून प्रवाशांना खासगी वाहनात बसवून राहुरी फॅक्टरी, विळद घाट, पांढरीचापूल परिसरात नेवून त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील दागिने, मोबाइल, पैसे लुटणारी टोळी कोतवाली पोलिसांनी जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून 11 लाख 46 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी कय्युम काझी कुरेशी (वय-23, रा. बाबा बंगाली जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, नगर), सद्दाम मोहम्मद आली (वय-23,झेंडीगेट,नगर), मोईन बादशहा शेख (वय-20, बुरुडगाव रोड,भोसले आखाडा, नगर), सुसेफ नासीर शेख (वय-20, मुकुंद नगर) चौघांना ताब्यात घेतले आहे. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मागदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांना मिळालेल्या माहितीनुसार प्रवाशांना लुटमार करणारे टोळी कुरेशी याच्या साथीदारांनी केली. तसेच ते माळीवाडा येथे येणार असल्याचे समजले.
त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ यांच्या पथकाने सापळा रचवून आरोपीस ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 11 लाख 46 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शाहीद शेख, गणेश धोत्रे, नितीन शिंदे, भारत इंगळे, सुजय हिवाळे, प्रमोद लहारे यांनी केली.