नगर – गाडी लावण्याच्या किरकोळ कारणावरून एकास दोघजणांनी लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना पारनेर तालुक्यातील कोहकडी शिवारात घडली आहे. याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोहकडी येथे सोन्याबापू वसंत घावटे (वय 32, रा.घावटे मळा,जा.शिरूर) यांच्यात व ज्योतिराम कारखिले, नवनाथ कारखिले रा.राळेगण थेरपाळ, ता.पारनेर या दोघांनी गाडी लावण्याच्या कारणावरून वाद झाले. या वादातून ज्योतिराम कारखिले याने घावटे यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला.