पुणे : पेरूचा भाव कमी न करण्याच्या किरकोळ कारणावरून पेरू विक्रेत्यावर चाकुने सपासप वार करून, विक्रेत्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना खराडी बायपास रस्त्यावर घडली.
या प्रकरणात् चंदनगर पोलिसांनी महेश रामेश्वर खुरंगळे (वय.30,रा. संभाजीनगर, चंदनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सुरेश शिंदे (वय.42,रा.मांजरी) यांनी फिर्याद दिली आहे. तर प्रशांत कल्याण जाधव (वय.30,रा.कुंजीर वस्ती मांजरी) असे वार झालेल्या विक्रेत्याचे नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. आरोपी विरुद्ध 2017 मध्ये मारामारीचा गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत हे पेरु विक्रीचा व्यावसाय करतात. नेहमीप्रमाणे ते खराडी बायबास रस्त्यावर डॉमीनोज पिझ्झा शॉपच्या समोर पेरू विक्री करत होते. त्यावेळी आरोपी मयूरने त्यांना कमी किंमतीत पेरु मागितले. मात्र, परवडत नसल्याने त्यांनी मयूरला पेरु देण्यास नकार दिला. त्याच रागातून मयूरने प्रशांतच्या पोटावर पाठीवर, मांडीवर चाकूने वार करुन गंभीर जखमी केले. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव करीत आहेत.