खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला

उस्मानाबाद – खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पडोळी (नायगाव) येथे एका तरुणाने हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यात ओमराजे निंबाळकर जखमी झाले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

सध्या राज्यात निवडणुकीचे वारे जोराने वाहत असून सर्वच पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. पडोळी (नायगाव) येथे शिवसेना उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ ओमराजे निंबाळकर पदयात्रेत सहभागी झाले होते. यावेळी एका तरुणाने ओमराजेंना हस्तांदोलन करण्याच्या बहाण्याने दुसऱ्या हाताने त्यांच्यावर चाकू हल्ला केला. यामध्ये ओमराजेंच्या पोटावर, हातावर आणि मनगटावर जखमा झाल्या. पण ओमराजे सुखरूप असल्याचे समजत आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी पोहचली मात्र हल्लेखोर तरूण पळून गेला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.