नवी मुंबई – दिल्ली कॅपिटल्सने आधी फलंदाजीत तुफान फटकेबाजी आणि नंतर भेदक गोलंदाजीच्या जोरावर गुणतालिकेत अव्वल असणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला 44 धावांनी मात दिली आहे. नाणेफेक(Toss) हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्ससमोर 216 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात कोलकाताचा संघ 19.4 षटकांत 171 धावांत सर्वबाद झाला.
खलील अहमद आणि कुलदीप यादव यांच्या गोलंदाजीसमोर कोलकाताचा संपूर्ण संघ गारद झाला. कुलदीपने 16व्या षटकात तीन विकेट्स घेतल्या. या षटकात त्याने पॅट कमिन्स, सुनील नरेन आणि उमेश यादव यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. याशिवाय कर्णधार श्रेयस अय्यरची विकेटही घेतली. कोलकाताकडून श्रेयसने सर्वाधिक 54 धावा केल्या. राणा 30 धावा करुन बाद झाला. रसेलने 24, वेंकटेशने 18 आणि सॅमने 15 धावांची खेळी केली. इतर फलंदाजांना दुहेरी संख्याही गाठता आली नाही. दिल्लीकडून कुलदीप यादवने 4, खलील अहमदने महत्त्वाच्या 3, शार्दूलने 2 तर ललिलतने एक विकेट घेतली.
Need we say anything? 💙❤️#YehHaiNayiDilli | #IPL2022 | #KKRvDC #TATAIPL | #IPL | #DelhiCapitals pic.twitter.com/7CpqBa8lNk
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 10, 2022
तत्पूर्वी, नाणेफेक(Toss) हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्ससमोर 216 धावांचे लक्ष्य ठेवले होते. दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नरने 45 चेंडूत सर्वाधिक 61 धावांची खेळी केली तर सलामीवीर पृथ्वी शॉने 29 चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 51 धावा केल्या.
त्याच वेळी, शेवटी शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल यांनी जोरदार फलंदाजी केली. अक्षरने 14 चेंडूत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 22 धावा तर शार्दुलने 11 चेंडूत एक चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 29 धावा केल्या. दोघांनी शेवटच्या 20 चेंडूत नाबाद 49 धावा जोडून दिल्लीला 215 धावांपर्यंत नेले. केकेआरकडून नारायणने दोन तर वरुण, रसेल आणि उमेशने प्रत्येकी एक विकेट घेतली.