नवी दिल्ली: कोलकाता नाईट रायडर (केकेआर) संघाचा आक्रमक खेळाडू व ऑस्ट्रेलियाचा नवोदितफलंदाज ख्रिस लिनला इंडियन प्रीमिअर लीगमधून करारमुक्त केल्याबद्दल केकेआरला आता आपल्याच निर्णयाचा फटका बसणार आहे.
अबुधाबीत सुरू असलेल्या टी-10 लीगमध्ये आक्रमक फलंदाजी करत मराठा अरेबियन्सकडून खेळताना केवळ 30 चेंडूत 9 चौकार आणि 7 षटकारांसह 91 धावा केल्या.
अशा खेळाडूला मुक्त केल्याने केकेआरचेच नुकसान होणार आहे. टी-10 लीगमध्ये सर्वाधिक धावा लीनने केल्या आहेत. लीनच्या खेळीच्या जोरावर मराठा अरेबियन्सने अबुधाबीविरुद्ध 2 बाद 138 धावा केल्या.
इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) 2020 च्या लिलाव प्रक्रियेआधीच लीनला मुक्त केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.