मुंबई : IPL 2022 चा 47 वा सामना आज खेळला जात आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरुद्ध टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
#KKR have won the toss and they will bowl first against #RR.
Live – https://t.co/fVVHGJTNYn #KKRvRR #TATAIPL pic.twitter.com/e7iSS3QKmW
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2022
राजस्थानने संघात एक बदल करत डॅरेल मिशेलच्या जागी करुण नायरचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे. तर दुसरीकडे कोलकाताने संघात दोन बदल केले आहेत. हर्षित राणा आणि व्यंकटेश अय्यर यांच्या ऐवजी संघात शिवम मावी आणि अनुकुल रॉय यांना संधी देण्यात आली आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग-11 :-
कोलकाता नाईट रायडर्स : आरोन फिंच, बाबा इंद्रजित (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंग, सुनील नरेन, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, शिवम मावी, टिम साऊदी, उमेश यादव
राजस्थान रॉयल्स : जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, करुण नायर, रियान पराग, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, कुलदीप सेन, युझवेंद्र चहल
दरम्यान, राजस्थानचा संघ सहा सामने जिंकून यंदाच्या आयपीएल 2022 मोसमात तिसऱ्या स्थानावर आहे, तर कोलकाता सलग पाच पराभवानंतर आठव्या स्थानावर पोहोचला आहे.