केरळ : करोना काळात प्रभावी काम करणाऱ्या आरोग्यमंत्र्यांना नव्या मंत्रीमंडळातून डच्चू

तिरुअंनपुरमदेशातील अनेक राज्यात करोनाने थैमान घातलं आहे. दुसऱ्या लाटने सुरुवातीला महाराष्ट्र आणि आता उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजधानी दिल्ली हाहाकार माजवला आहे. मात्र त्याचवेळी केरळ सरकारने करोनाचा यशस्वी सामना करून या संसर्गाला आटोक्यात आणलं. केरळच्या आरोग्यमंत्री के.के. शैलजा यांच्या कामाचं कौतुकही झालं होतं. मात्र त्याच शैलजा यांना नव्या मंत्रीमंडळातून डच्चू देण्यात आला आहे.

केरळमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले तरी केरळ सरकारने आरोग्यमंत्री शैलजा यांच्या नेतृत्वात करोनाचे योग्य व्यवस्थापन केल होते. आता केरळमध्ये विधानसभा निवडणूक होऊन राज्यात पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा डाव्यांची सत्ता आली. मात्र शैलजा यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाणार नाही. यावेळी मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या नेतृत्वाखालील कॅबिनेटमध्ये भाकप आणि माकपमधील नव्या चेहऱ्यांचा समावेश केला जाणार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देखील करोना काळात शैलजा यांनी केलेल्या कामाचं कौतुक केलं होतं. तसेच त्यांच्या कार्याचे अनुकरण इतर राज्यांनी करण्याचे आवाहन केले होते. मात्र त्यांनाच आता मंत्रीमंडळातून डावलण्यात आलं आहे.

शैलजा या निवृत्त शिक्षिका असून त्यांनी करोना काळात प्रशंसनीय काम केलं होतं. यापूर्वी २०१८ आणि २०१९ मध्ये निपाह विषाणूच्या फैलाव रोखण्यात देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.