‘किया’ स्वस्त इलेक्‍ट्रिक कार सादर करणार

नवी दिल्ली – भारतीय वाहन बाजाराबाबत आम्ही आशावादी आहोत त्याचबरोबर नजीकच्या भविष्यात लोकांना परवडेल, असे स्वस्त इलेक्‍ट्रिक कार ह्युंदाई कंपनीच्या मदतीने सादर करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे किया मोटर्स कार्पोरेशनचे अध्यक्ष हॅन-वू-पार्क यांनी सांगितले.

ते म्हणाले की, नुकतेच जागतिक बाजारासाठी तयार केलेल्या सेल्टॉस एसयूव्हीसह दोन वर्षात आम्ही 4 वाहने सादर करणार आहोत. या इलेक्‍ट्रिक कारसाठी सरकारचे फेम योजनेअंतर्गतचे अनुदान मिळण्याची शक्‍यता आहे.

किया सादर करणार असलेल्या 4 वाहनांत इलेक्‍ट्रिक कारचा समावेश आहे का, असे विचारले असता ते म्हणाले की इलेक्‍ट्रिक वाहन एकदम पूर्णपणे वेगळे आहे. 2018 च्या ऑटो एक्‍स्पोमध्ये आम्ही याबाबत माहिती दिली होती आमच्याकडे हायब्रीड, हायब्रीड इलेक्‍ट्रिक तंत्रज्ञानात कियाने जागतिक पातळीवर अशी वाहने विकसित केली आहेत. आम्ही इलेक्‍ट्रिक कार सादर करण्याची तयारी केली आहे. मात्र, त्यासाठी पायाभूत सुविधांची गरज आहे तशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आम्ही हे वाहन भारतात सादर करू. इलेक्‍ट्रिक वाहनातची किंमत जास्त आहे. भारतीय ग्राहकांना सरकारी मदतीशिवाय ही वाहने परवडणार नाहीत. जाहीर केलेल्या अनुदानाचा फायदा फक्त दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना होणार आहे. त्यामध्ये कारचाही यात समावेश केला जाण्याची गरज आहे.

सेल्टॉस या वाहनाबद्दल त्यांनी सांगितले की, हे वाहन भारतीय गरजा ध्यानात घेऊन तयार करण्यात आले आहे. भारतातील गरजा पूर्ण झाल्यानंतर या वाहनाच्या निर्यातीचा विचार करण्यात येईल. पुढील महिन्यापासून हे वाहन भारतात उपलब्ध होणार आहे. त्यासाठी वेगळ्या डीलरशिप तयार करण्यात आल्या आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here