किसिंग सीन, आदित्य आणि खुलासा

आगामी “मलंग’ या चित्रपटाच्या पोस्टरमुळे सध्या अभिनेता आदित्य रॉय कपूर सोशल मीडियावर ट्रोल केला जात आहे. या पोस्टरमध्येएका योगाच्या पोझमध्येआदित्यने दिशाला किस केले आहे. या योग किसमुळे आदित्यवर ट्रोलर्सकडून प्रचंड टीका होत आहे.


या टीकेला उत्तर देताना आदित्यने लिहिले आहे की, दिशाला अत्यंत अवघडलेल्या परिस्थितीतही किस करताना मला खूप सहजता वाटली. आदित्य याबाबत सहनायिका म्हणून दिशाची प्रशंसाही करतो. आदित्य म्हणतो, दिशा खूप वजनदार नाहीये; त्यामुळेच मी तिला सहजगत्या उचलू शकलो. पण प्रत्यक्षात ही पोझ दिशासाठी खूप अवघड होती.


कारण तिला पुढच्या बाजूला झुकायचे होते. पण मी एक साहाय्यकाची भूमिका नेहमीच पार पाडत असतो. त्यानुसार मी माझ्या हालचाली ठेवल्या. “मलंग’ हा चित्रपट माझ्या करिअरसाठी खूप महत्त्वाचा असल्याचे आदित्य सांगतो. तसेच या चित्रपटाच्या एकंदरीतच वाटचालीविषयी तो दिग्दर्शक मोहित सुरीचे आभारही मानतो.


“आशिकी 2′ या आदित्य रॉय कपूरच्या पहिल्या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शनही मोहितनेचे केले होते. त्यामुळे मोहित माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, असे आदित्य सांगतो. “मलंग’ ही एक हटके लव्हस्टोरी असून ती प्रेक्षकांना भरपूर आवडेल असा विश्‍वासही तो व्यक्‍त करतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.