१५ ऑगस्ट १९४७ ला किशोर कुमार यांचा ‘हा’ चित्रपट झाला होता प्रदर्शित 

हिंदी सिनेमा म्हटलं कि चाहत्यांची काही कमी नाही. आज हिंदी चित्रपटांची होणारी दमदार कमाई बघितली तर हे स्पष्ट होते. आजही लोक तेवढ्याच उत्साहाने सिनेमागृहामध्ये जातात जेवढ्या उत्साहाने ते स्वातंत्र्याच्या काळात जात होते. एकीकडे १५ ऑगस्ट १९४७ ला संपूर्ण भारत स्वातंत्र्याच्या उत्सवात मग्न होता. तर दुसरीकडे त्याच दिवशी एक हिंदी चित्रपट प्रसिद्ध झाला होता.

आयएमबीडीच्या म्हणण्यानुसार १५ ऑगस्ट १९४७ रोजी ‘शहनाई’ चित्रपट प्रसिद्ध झाला होता. या चित्रपटात पी.एल. संतोषी यांनी दिग्दर्शन केले होते. तसेच किशोर कुमार, इंदुमती, राधाकृष्णा, व्ही.एच. देसाई आणि रेहाना हे महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये होते. सी रामचंद्र यांनी त्यासाठी संगीत दिले होते. अहवालानुसार शहनाई चित्रपट १९४७ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. त्या चित्रपटाची गाणीही खूप गाजली होती.

चित्रपटात किशोर कुमारने पोलिस निरीक्षकाची भूमिका केली होती. इंदुमती ही जमींदारची मुलगी होती तर राधाकृष्णा जमीनदारांचे सेक्रेटरी होते. आणि व्ही.एच. देसाई यांनी विनोदी पात्र साकारले होते. हा चित्रपट १३३ मिनिटांचा होता.

पी.एल. संतोषी यांनी बॉलिवूडला एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत. त्यांनी बरसात की रात, दिल ही तो है, सरगम, हम एक हैं, पहली रात, कव्वाली की रात और विद्या असे चित्रपट केले आहेत.

त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी बरेच चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. यावेळी (१५ ऑगस्ट २०१९) दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडकणार आहेत. अक्षय कुमारचा मिशन मंगल आणि जॉन अब्राहमचा बाटला हाऊस. कोण कोणावर भारी पडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)