भोपाळ : सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री रहेमान यांना आज मध्यप्रदेश सरकारकडून दिला जाणारा किशोर कुमार पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईत वहीदा रहेमान यांच्या निवासस्थानी मध्यप्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री विजय लक्ष्मी साधो यांनी पुरस्कार दिला. प्रशस्तिपत्र आणि दोन लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
वहीदा रहेमान यांनी पुरस्काराबद्दल मध्यप्रदेश सरकारचे आभार मानले आहेत.
महान अभिनेता-गायक किशोर कुमार यांच्या जयंतीनिमित्त गेल्या ऑक्टोबरमध्ये खंडवा शहरात आयोजित कार्यक्रमात 82 वर्षीय वहीदा रेहमान सहभागी होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांना घरी जाऊन हा पुरस्कार देण्यात आला, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.
3 फेब्रुवारीला रेहमान यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने साहो यांनी शुभेच्छाही दिल्या. यावेळी मध्य प्रदेश संस्कृती विभागाचे प्रधान सचिव पंकज राग हे देखील उपस्थित होते, असेही ते म्हणाले.