मशीनद्वारे ऊस तोडणीसाठी “किसनवीर’ची यंत्रणा सज्ज

कवठे (प्रतिनिधी) – येणाऱ्या गळीत हंगामासाठी मशिनद्वारे ऊस तोडणीसाठी किसनवीर सहकारी साखर कारखान्याची यंत्रणा सज्ज झाली आहे. कारखान्याच्या केन हार्वेस्टरच मशिनच्या दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरु आहेत.

भुईंज येथील हार्वेस्टर मशीन मालक शाहुराज भोसले पाटील यांच्या मशीनची दुरुस्तीचे काम सुरू असताना किसन वीर उद्योग समुहाचे अध्यक्ष मदन भोसले यांनी भेट दिली व मशीन दुरुस्तीची माहिती घेतली. यावेळी हणमंतराव गायकवाड, न्यू हॉलंड कंपनीचे सेवा अभियंता बसवराज कोरे, तंत्रज्ञ अनिकेत भालेगरे, सागर ब्यास, जितेंद्र कुमार, गोविंद माळी, गणेश बनकर आणि इक्‍बाल अहमद (टेक फोर्स टीम) होती.

किसन वीर कारखाना व्यवस्थापनाने ऊस गळीत हंगाम यशस्वी होण्यासाठी यांत्रिकीकरणाद्वारे ऊसतोड करण्यासाठी पुढाकार घेऊन कारखान्याच्या माध्यमातून वाहन मालकांनी न्यू हॉलंड कंपनीच्या 40 ऊस तोड मशीन खरेदी केल्या होत्या. मागील हंगामात ऊसतोड कामगारांच्या कमतरतेमुळे ऊसाचे गाळप करणेसाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. परंतु मशीनद्वारे ऊस तोड केल्यामुळे गळीत हंगाम यशस्वी झाला. यंदाचा हंगाम यशस्वी करण्याच्या दृष्टीने हार्वेस्टर मालकांनी कंपनीच्या माध्यमातून मशीन दुरुस्तीची कामे हातात घेतली असून ती अंतिम टप्प्यात आलेली असून लवकरच गळीत हंगामासाठी सज्ज होतील, असे न्यू हॉलंड कंपनीच्या तज्ञांनी अध्यक्ष मदन भोसले यांना सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.