ह.भ.प. ताजुद्दीन महाराज शेख यांचे निधन, कीर्तन सुरू असताना आला हृदयविकाराचा झटका

औरंगाबाद – हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले ह.भ.प. ताजुद्दीन महाराज शेख यांचे निधन झाले आहे. काल रात्री कीर्तन सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. ही घटना काल रात्री नंदूरबार येथे घडली. भजन करत असताना मरण येणे हे फार मोठ्या साधूत्वाचे लक्षण असल्याचे वारकरी संप्रदायात समजले जाते.

हिंदू मुसलमान दोघांतील दरी मिटवण्यासाठी त्यांनी हजारो कीर्तने केली. त्यांचा जन्म औरंगाबाद जवळील सातारा भागात झाला होता. त्यांना लहानपणापासूनच कीर्तनाची आवड होती. त्यांच्या या आवडीमुळे त्यांना आणि कुटुंबाला त्रास ही सहन करावा लागल्याचे बालले जाते.

नेहमी प्रमाणे ताजुद्दीन महाराज यांचे कीर्तन सुरू होते. त्यांच्या या कीर्तनाला नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. त्याचवेळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि ते स्टेजवर खाली बसले. काही जण आपल्या मोबाइलमध्ये कीर्तन शूट करत होते. त्याचवेळी ताजुद्दीन महाराजांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुस्लीम असतानाही ताजुद्दीन बाबा यांना गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, गाथा, संत परंपरेबाबत मोठे ज्ञान अवगत होते. गीता आणि कुराण या दोन्हींचा त्यांचा चांगला अभ्यास होता. अनेकदा ताजुद्दीन महाराज यांनी सांगितले आहे की, लहानपणापासूनच त्यांना संत, वारकरी सांप्रदायाबाबत आवड, प्रेम होते. वारकरी संप्रदायाचे संस्कार असल्याने त्यांना लहानपणापासून भजन, कीर्तन करण्यात रस होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.