‘माऊली म्हटल्यामुळे किर्तनकार शिवलीला स्वतःला देवी समजते’

मुंबई –   आता  खरा खेळ सुरु झालाय ! बिग बॉस घरातील सदस्यांना नवनवे टास्क देत असतात. आणि टास्कमध्ये काही सदस्य बाजी मारतात तर काहींनाच्या हाती हार येते. बिग बॉस मराठी सिझन तिसराचा नॉमिनेशन टास्क पार पडल्यानंतर आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणर आहे.

याचदरम्यान बिग बॉसच्या घरातील गायक उत्कर्ष शिंदे यांनी सिजनच्या सुरुवातीलाच  मीरासोबत बोलताना घरातील सदस्य किर्तनकार शिवलीला पाटील हिच्याबद्दल बोलल्या शब्दांमुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे.  

उत्कर्षने मीराशी बोलतांना सर्व  सदस्यांबाबत चर्चा केली त्यावेळी  उत्कर्षने शिवलीलाला आपल्या बाजूने वळवून घेऊ शकतो असं म्हटलं, उत्कर्ष म्हणाला, ‘शिवलीला अगदी साधी आहे. तिला काही कळत नाही. तिला माऊली म्हटलं की ती स्वतःला देव समजते. तिला वाटतं आपण देवी आहोत. विशालदेखील तेच करतोय.’ असं म्हणत त्याने आपलं मत मांडले मात्र आता त्याला हे चांगलेच महागात पडले आहे . 

बिग बॉसच्या चाहत्यावर्गाने त्याची चांगलीच शाळा घेतली आहे. सोशलवर त्यांचा या मतावर अनेकांनी त्याला उत्कर्ष असा कसा बोलू शकतो. याला बोलण्याची मुळीच पद्धत नाहीये. देवी समजते म्हणजे? यालाचं सगळं कळतं का? असं म्हणत त्याचा विरोध केला आहे. 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.