कोल्हापूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी माजी खासदार व भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर दौऱ्याचे गेल्या दोन आठवड्या पूर्वी आयोजन केले होते. परंतु त्यांना दौऱ्यादरम्यान कराड येथे रोखण्यात आले होते. यानंतर ते पुन्हा आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेतलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर टीका केली आहे.
काय म्हणाले किरीट सोमय्या
‘मी आंबेमातेकडे प्रार्थना केली आहे की, जसा त्याकाळात मातेनं राक्षसाचा वध केला होता. आत्ता महाराष्ट्राला भ्रष्टाचाररुपी एक शाप मिळालाय, भ्रष्टाचाराचा राक्षस तयार झाला आहे, त्याचा वध करण्यासाठी मला शक्ती दे’