ठाणे – ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा भागातील प्राईम रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या दुर्घटनास्थळी पाहणीसाठी आलेले भाजपचे नेते किरीट सोमैय्या यांनी तेथे राजकीय विधाने केल्यानंतर तेथे जमलेल्या जमावाने त्यांना त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करून पिटाळून लावल्याची घटना घडली आहे.
ठाकरे सरकारच्या काळात कोविड हत्याकांड सुरू आहे, अशा आशयाचे विधान त्यांनी केले होते. त्यांच्या या विधानाला तेथील विरोधी पक्षनेते अश्रफ जानू पठाण यांनी जोरदार आक्षेप घेत त्यांना चांगलेच फटकारले. त्यांनी नमूद केले की आम्ही प्रत्यक्ष जीव वाचवण्यासाठी मदतकार्य करीत आहोत. मदतीच्यावेळी घरात बसणाऱ्या नेत्यांनी येथे येऊन राजकारण सुरू केले तर आम्ही ते खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी सोमैय्या यांना दिला.
#Mumbrafire #Mumbra #Thane #BJP leader Kirit Somaiya visits Prime Criticare Hospital where four patients died after a fire broke out in the early hours of Wednesday.@KiritSomaiya pic.twitter.com/zIPPJfgQgL
— Waldemarr Whosane (@HRH162) April 28, 2021
हिंमत असेल तर केंद्राकडून मदत मिळवून दाखवा, असे आव्हानही त्यांनी सोमैय्या यांना दिले. त्यानंतर पठाण यांच्या समर्थकांनी सोमैय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केल्यानंतर सोमैय्या यांना आपल्या पावली तेथून परत फिरावे लागले आहे.