सोमय्या यांच्या या व्हिडीओ-बाईटवर नेटकरी मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहेत
मुंबई – आपल्या राजकीय विरोधकांवर सातत्याने ‘कागदोपत्री’ पुराव्यांच्या फैरी झाडणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये किरीट सोमय्या एका पत्रकाराच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर न देता केवळ, “मी आपल्याला आधीच उत्तर दिलेलं आहे” असं वारंवार सांगताना दिसत आहेत.
या व्हिडीओबाबत अधिक माहिती अशी की, एनडीटीव्ही या नामांकित वृत्तवाहिनीचे एक पत्रकार किरीट सोमय्या यांना, शालेय विद्यार्थ्यांसमोर सुधारित नागरिकत्व कायद्यास विरोध करणाऱ्यांना देशद्रोही संबोधने योग्य आहे काय? सुधारित नागरिकत्व कायद्याला समर्थन दर्शवणारी पत्रं विद्यार्थ्यांनी लिहून ती पंतप्रधानांना पाठवायला सांगणं हे राजकारण योग्य आहे काय? असे प्रश्न विचारताना दिसत आहेत. मात्र किरीट सोमय्या या पत्रकाराच्या प्रत्येक प्रश्नास, ‘मैंने आपको जवाब दे दिया है!’ एवढंच उत्तर देताना दिसत आहेत. पत्रकाराच्या प्रत्येक प्रश्नानंतर किरीट सोमय्या ‘मैंने आपको जवाब दे दिया है!’ अशी पुनरावृत्ती करत असताना सदर पत्रकार आपण या प्रश्नांची उत्तर दिली नाहीत कृपया या प्रश्नांची उत्तरं द्या अशी विनंती करताना देखील दिसत आहे.
दरम्यान, किरीट सोमय्यांचा हा व्हिडीओ-बाईट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चिला जात असून या व्हिडीओवरून काही नेटकऱ्यांनी सोमय्या यांच्यावर टीका केली आहे तर काहींनी सोमय्यांची पाठराखण केली आहे.
My viva every single time:- ?#KiritSomaiya pic.twitter.com/NbV1EyX8Kb
— Dhokla Scientist (@dhoklascientist) January 14, 2020
???
Really this reporter needs to be given award for his patience.
If i was a reporter in his place asking questions and he replying same damn thing ” maine apko jawab de diya hai”.i would have slapped him after frustration and anger.. salute you brave boy..#KiritSomaiya https://t.co/2OogVRwcAX— lalit kirola (@KirolaLalit) January 14, 2020
#KiritSomaiya #BJP , excellent Kirit bhai!!! This media house deserves this answer only!!! We are proud of you!!!!?????? https://t.co/IGsVdAvq8n
— Ila Shah (@Pravinela) January 13, 2020