मुंबई – शिवसेना आणि भाजपनेते किरीट सोमय्या यांच्यातील वादंग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातच सोमय्या यांच्यावर रविवारी शिवसैनिकांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात येतोय. आता सोमय्या आणि शिवसेना वादात काँग्रेसने उडी घेतली आहे.
काँग्रेसकडून सोमय्या यांच्यावर खोचक टीका करण्यात आली. किरीट सोमय्या हे नख कापून परमवीर चक्राचे दावेदार बनू इच्छित असल्याचं ट्विट काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केलं आहे.
रविवारी किरीट सोमय्या यांच्या कारवर झालेल्या हल्ल्यामुळे भाजप आक्रमक झाले आहे. या हल्ल्यात सोमय्या जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र यावरून काँग्रेसने सोमय्या यांच्या दुखापतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
किरीट सोमय्या नख कापून परमवीर चक्राचे दावेदार बनू इच्छित आहेत.
डॉक्टरांनुसार 0.5 cm x 0.1 cm x 0.1 cm चा ठिपका चेहेऱ्यावर आला. तो आणला गेला का? हे चौकशीअंती स्पष्ट होईलच पण २ दिवसांत बँडेज गायब झाले तसा आता तो दिसेनासाही झाला. या नौटंकीने महाराष्ट्राचे राजकारण गढूळ होत आहे— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) April 25, 2022
डॉक्टरांनुसार 0.5 cm x 0.1 cm x 0.1 cm चा ठिपका सोमय्या यांच्या चेहेऱ्यावर आला. तो आणला गेला का? हे चौकशीअंती स्पष्ट होईलच पण 2 दिवसांत बँडेज गायब झाले तसा आता तो दिसेनासाही झाला. या नौटंकीने महाराष्ट्राचे राजकारण गढूळ होत असल्याचे सावंत यांनी म्हटले.