मुंबई – भाजप नेते किरीट सोमय्या हे नेहमीच राज्य सरकारमधील अनेक नेत्यांचा भष्ट्राचारबाबत बोलत असतात. त्यांनी राज्यातील ठाकरे सरकारला आव्हान दिलं आहे ते लवकरच घोटाळा मुक्त महाराष्ट्र सरकार करतील. यातच त्यांनी यावेळी पवारांचा मुलगा जय अजित पवार जेलमध्ये जाणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
ते म्हणाले माध्यमांशी बोलतांना म्हणाले,’किरीट सोमय्यांनी धमक्या देणं , मुजोरी , दादागिरी सहन करणार नाही, असं ठाकरे सरकारचे नेते म्हणतात, मुख्यमंत्र्यांमध्ये कारवाईची हिम्मत नाही, मी चॅलेंज करतो मला हात लावून दाखवा, असंही ते म्हणाले आहेत.
ते पुढे म्हणाले,’ अजित पवार यांची 1 हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त झालीय. आता अजित पवारांचा मुलगा जय अजित पवार जेलमध्ये जाणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
मी येत्या काही दिवसात रायगड कर्जतला जाणार नंतरच्या काळात पेशव्यांची, वैजनाथ इथली हिंदू देवस्थानची जमीन सलीम बिलाखियाच्या नावाने कशी गेली याची चौकशी करणार असल्याचं सोमय्या म्हणाले.