Kirit Somaiya on Azan । राज्यातील मशिदींवरील लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावर आजपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वेळोवेळी आवाज उठवला आहे. दरम्यान आता मनसेनंतर याच मुद्द्यावरून भाजपही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील मशिदींमध्ये लावलेल्या लाऊडस्पीकरमुळे होणाऱ्या अति ध्वनी प्रदूषणाविरुद्ध भाजपने मोहीम सुरू केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत, पक्षाने मशिदींकडून परवानगीपेक्षा जास्त आवाज वाढवल्याबद्दल पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि इतर पक्षाचे नेते लाऊडस्पीकरच्या आवाजाबाबत आक्रमक भूमिका घेताना दिसून येत आहेत.
भांडुपच्या सोनापूर ब्लॉकमधील एका मशिदीतून येणाऱ्या आवाजाबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. घाटकोपरच्या गावदेवी परिसरात असलेल्या मशिदीतील भक्तांविरुद्ध किरीट सोमय्या यांनी घाटकोपर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावेळी सोमय्या यांनी,”घाटकोपरमधील कोणत्याही मशिदीने लाऊडस्पीकर वापरण्यासाठी पोलिसांकडून परवानगी घेतलेली नाही.” असा आरोप केला आहे. त्यासोबतच त्यांनी,”कायद्याचे पालन केले पाहिजे आणि यापुढे आम्ही हा अत्याचार सहन करणार नाही ” असे आक्रमकपणे त्यांनी म्हटले आहे.
मुंबई पोलिस अॅक्शन मोडमध्ये Kirit Somaiya on Azan ।
मिळालेल्या माहितीनुसार, मशिदींवर लावलेल्या लाऊडस्पीकरमधून आवाज येत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर मुंबई पोलिस कारवाईत उतरले आहेत. पोलिस चौकशीसाठी रस्त्यावर उतरले. अजान सुरू होण्यापूर्वी आणि नंतर मशिदींसमोर डेसिबल मीटरने पोलिस थेट तपासणी करत आहेत. या काळात, ज्या मशिदी कायद्याचे उल्लंघन करत आहेत त्यांना पोलिस नोटिसा बजावत आहेत.
यापूर्वीदेखील अशा प्रकरणात कारवाई Kirit Somaiya on Azan ।
यापूर्वी १९ मे २०२३ रोजी मोहम्मदी जामा मस्जिद सोनियापूर वैथुन येथे अशाच एका प्रकरणात कारवाई करण्यात आली होती. जिथे जमील अहमद खानला कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल १२५०० रुपये दंड ठोठावण्यात आला. त्याचप्रमाणे, मोहम्मदिया जामा मस्जिद सोनापूरमधून येणारा आवाज खूप जास्त असल्याचे आढळून आल्यावर कारवाई करण्यात आली. त्याच वर्षी १ ऑगस्ट रोजी मशिदीच्या कार्यकारी सदस्यावर कारवाई करण्यात आली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे बऱ्याच काळापासून मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्याबाबत बोलत आहेत. गेल्या वर्षी त्यांनी असेही म्हटले होते की जर मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवले नाहीत तर आम्ही मशिदींसमोर हनुमान चालीसा पठण करू.