Chandrashekhar Bawankule | आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षांमध्ये जागा वाटपासंदर्भातही चर्चा सुरु आहेत. यादरम्यान भाजपाचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या हे पक्षावर नाराज असल्याची सध्या चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
किरीट सोमय्या यांची विधानसभा निवडणूक संपर्कप्रमुखपदी नियुक्ती पक्षाकडून जाहीर करण्यात आली होती. मात्र, किरीट सोमय्या यांनी हे पद नाकारलं आहे. या नियुक्तीनंतर किरीट सोमय्या हे प्रचंड संतापले आहेत. ‘मला न विचारता नियुक्ती का केली,’ असे म्हणत त्यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी नाकारली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया
किरीट सोमय्या यांच्या या निर्णयानंतर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “माजी खासदार किरीट सोमय्या हे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. मात्र, कोणाला विचारून पक्षाचे नेतृत्व हे एखादे पद किंवा जबाबदारी देत नाही, याबाबत तसा नियमही आहे. मला प्रदेशाध्यपदाची जबाबदारी देण्यात आली, मलाही पक्षाने विचारलं नाही, तुम्ही काम करा सांगितलं. शेवटी पक्षाचा एक प्लॅटफॉर्म आहे आणि त्या अनुषंगाने किरीट सोमय्या यांना पक्षाने जबाबदारी दिली. ही जबाबदारी तेयोग्य पद्धतीने पार पाडतील”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. Chandrashekhar Bawankule |
किरीट सोमय्या नाराज
भाजपच्या या घोषणेमुळे सोमय्या कमालीचे नाराज झाले असून रावसाहेब दानवे यांना पत्र लिहिलं आहे. ‘आपण विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली ही पद्धत चुकीची आहे, मला हे अमान्य आहे. आपण यासाठी अन्य कोणाची तरी नियुक्ती करावी,’ असे त्यांनी रावसाहेब दानवेंना लिहिलेल्या पत्रात म्हंटले आहे. Chandrashekhar Bawankule |
‘मी विधानसभा निवडणुकीसाठी मी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले आहे. मी काम करतोय आणि करत राहणार आहे. आपल्या या समितीचा मी सदस्य नाही. आपण आणि प्रदेशाध्यक्षांनी पुन्हा अशा प्रकारची अपमानास्पद वागणूक देऊ नये,’ असं म्हणत सोमय्यांनी विनंती सुद्धा केली आहे. Chandrashekhar Bawankule |