क्रुजवर रेड करण्याआधी ऍक्टीव्ह होता किरण गोसावी; नवीन फोटोने खळबळ

मुंबई – आर्यन खान यांच्याशी निगडीत बहुचर्चित क्रुज रेड प्रकरणातील एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर वसुलीचे आरोप झाले. या प्रकरणात मंत्री नवाब मलिक यांनी अनेक आरोप केले असून समीर वानखेडेंनी हे आरोप फेटाळले आहे. मात्र मलिक यांनी सादर केलेल्या पुराव्यांवर वानखेडे यांना प्रत्युत्तर देता आलेले नाही. त्यातच आता किरण गोसावीसोबतचा वानखेडे यांचा फोटो समोर आला आहे.

या फोटोमध्ये क्रुजवर रेड करण्याआधी किरण गोसावी फुल अॅक्टीव्ह असल्याचं दिसून येतं. या संदर्भातील एक फोटो समोर आला आहे. यामध्ये किरण गोसावी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या मागे उभा असल्याचं दिसून येतं. यावरून गोसावी याला एनसीबीमध्ये किती महत्त्व देण्यात आलं हे दिसून येत आहे.

दरम्यान या प्रकऱणात आता नवाब मलिक यांनी सोमरावी समीर वानखेडे यांच्यावर आणखी काही आरोप केले. मलिक यांनी आपण ट्विट केलेले कागदपत्र खोटे असतील तर खरे कागदपत्र दाखवा, अस आव्हान दिलं आहे.

दुसरीकडे किरण गोसावी अद्याप पोलिसांनी शरण आलेले नाही. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गोसावी याच्यावर प्रभाकर साईल याने केलेल्या आरोपांमुळे  खळबळ उडाली होती.  एकूणच या प्रकरणात आणखी काय-काय खुलासे होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.