आर्यन खान प्रकरणातील एनसीबीचा साक्षीदार किरण गोसावी पालघर पोलिसांच्या ताब्यात

पालघर – आर्यन खान प्रकरणात एनसीबीचा साक्षीदार असणाऱ्या किरण गोसावीला पुणे पोलिसांकडून ताब्यात घेऊन पालघर पोलिसांनी अटक केली. फसवणुकीच्या एका प्रकरणात ही कारवाई करण्यात आली.

किरण गोसावी 11 नोव्हेंबरपासून लष्कर पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीत होता. त्यापूर्वी त्याला फरासखाना पोलिस ठाण्यात अशाच एका प्रकरणात अटक करून 12 दिवस कोठडीत ठेवण्यात आले होते. किरण गोसावी याच्यावर पुण्यातील फरासखाना, लष्कर, पुणे शहरातील वानवडी पोलीस ठाण्यात आणि पिंपरी चिंचवडच्या भोसरी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे एकूण चार गुन्हे दाखल आहेत.

गोसावी आणि त्याचा बॉडीगार्ड प्रभाकर रोहोजी साईल हे अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज प्रकरणात स्वतंत्र साक्षीदार आहेत. क्रूझवर छापा टाकल्यानंतर गोसावीने एका व्यक्तीकडून 50 लाख रुपये घेतल्याचा आरोप साईलने केला होता.

मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने आर्यनला अटक केल्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसोबतचा त्याचा सेल्फी व्हायरल झाल्यानंतर गोसावी प्रसिद्धीच्या झोतात आला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.