पुणे – जस क्रिकेट अकादमी पुणे यांच्या तर्फे आयोजित मान्सून प्रीमियर लीग 13 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत अश्मित कश्यप (नाबाद 76 धावा) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर किरण क्रिकेट अकादमी संघाने आर्यन्स क्रिकेट अकादमी संघाचा पराभव करून सनसनाटी विजय मिळवला.
धानोरी येथील जस क्रिकेट अकादमीच्या प्रकाश टिंगरे मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्यांदा खेळताना आर्यन्स क्रिकेट अकादमीने 20 षटकांत 8 बाद 138 धावा केल्या. यात तनिष कळमकर 29, साई निखिल नाबाद 22, युवराज चव्हाणडाके 19, शौनक शेवडे 14 यांनी महत्त्वपूर्ण खेळी करत संघाच्या डावाला आकार दिला.
प्रत्युत्तरात किरण क्रिकेट अकादमीने हे आव्हान 20 षटकात 2 बाद 139 धावा करून पूर्ण केले. सलामीवीर अश्मित कश्यपने नाबाद 76 धावांची खेळी करत विजयात सिंहाचा वाटा उचलला. अश्मितने अपूर्व ढगेसह 114 चेंडूत 124 धावांची सलामी देत संघाला विजय मिळवून दिला.