“एम एस धोनी’, “लस्ट स्टोरीज’, “कलंक’, “कबीर सिंग’ यासारख्या चित्रपटांमुळे किआरा अडवाणी हे नाव सध्या बरपूर चर्चेत आहे. मात्र सलमानच्या सल्ल्यामुळेच आपण नावात बदल केल्याचे किआराने काही महिन्यांपूर्वी सांगितले होते. जरी नाव सलमान खानच्या सल्ल्यामुळे बदलले असले तरी हे नाव तीने प्रियांका चोप्राच्या एका भूमिकेपासून प्रेरित असल्याचे किआराने सांगितले आहे.
किआराचे मूळ नाव हे आलिया अडवाणी आहे. मात्र, 2014 पुर्वी पासूनच आलिया भट्ट हे नाव या इण्डस्ट्रीत सर्वांना परिचयाचे होते. त्यामुळे या इण्डस्ट्रीत दोन आलिया झाल्या असत्या म्हणूनच सलमानच्या सल्ल्यावरून मी नाव बदलले, असे किआरा फिट अप विथ स्टार कार्यक्रमादरम्यान म्हणाली होती.
यावेळी आलिया ऐवजी किआरा नाव का ठेवले हे सांगताना ती म्हणाली की, मी प्रियांकाचा अंजाना अंजानी चित्रपट पाहिला होता. या चित्रपटाच्या सुरूवातीला प्रियांका स्वत:च्या नावाची ओळख किआरा म्हणून करून देते. मला हे नाव खूपच आवडले होते. मला जर मुलगी झाली तर तिचे नाव मी किआरा ठेवायचे असे पक्के केले होते. मात्र, सलमान खानने मला नाव बदलण्याचा सल्ला दिला त्यामुळे मी स्वत:साठी किआरा नावाची निवड केली’, असे तीने यावेली सांगितले.